बीड: बीडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निकटवर्तीयाचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कल योगेश कदम बीडच्या दौऱ्यावर असताना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या निकटवर्तीयाचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. योगेश कदम यांचा मोबाईल हरवलेला नसून त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हरवला असल्याची माहिती हरवल्याची माहिती योगेश कदम यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.