Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मिशन अयोध्या’चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 8 January 2025, 17:21

संभाजीनगर: अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम दाखवणार आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, ७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला आहे.

 

ख्रिश्चन धर्मगुरू किंवा मुस्लिम धर्मगुरू यांबद्दल..

आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले आहे.  मात्र या चित्रपटात मुस्लिम धर्मगुरु किंवा ख्रिश्चन धर्मगुरु यांच्या विरोधात काहीही दाखवले गेलेले नाही. मात्र आज हिंदू धर्मातील साधुसंतांबद्दल चांगले दाखविण्यात येत आहे, असे म्हणत महंत रामगिरी महाराजांनी, ‘मिशन अयोध्या’ मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच छत्रपती संभाजीनगर शहरातील एका भव्य मॅालमध्ये ‘मिशन अयोध्या’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते.

चित्रपट ट्रेलर लॉंच सोहळ्यास या मान्यवरांची उपस्थिती

भविष्यामध्ये यासाठीही संघर्ष करावा लागेल, असेही महाराज म्हणाले. यावेळी व्यास पीठवर आमदार अनुराधाताई चव्हाण, चित्रपटाचे निर्माते, कृष्णा शिंदे, योगीता शिंदे, दिग्दर्शक समीर सुर्वे, विरुपाक्ष महाराज, प्रल्हाद महाराज नवल, बद्री पठाडे, सुनील जगताप, रामचंद्र नरोटे, कृष्णा पाटील उकिर्डे, पद्माकर पडूळ, राम शिंदे, मधुकर महाराज, राधाकिशन पठाडे, विवेक ढोरे, रवी करमाडकर, बाबू महाराज आदींची उपस्थिती होती.

‘जय श्री राम’ नामाचा जयघोष

या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली आहे. तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली होती. संपूर्ण संभाजीनगर मिशन अयोध्यामय झाले होते. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्री राम’ नामाचाही जयघोष केला. तसेच यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आली होती.महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी लावण्यात आले होते.

इतिहास विषयाच्या शिक्षका केंद्रित कथा

मिशन सैनिकांचे असते, मिशन अतिरेक्यांचे असते. मग मिशन एका शिक्षकाचं का नसावं? असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलंही एक पान इतिहासात असावं, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे. अजित देशमुख हा इतिहास विषयचा शिक्षक असूनही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित करायचे ठरवले आहे. ज्याचं नाव आहे “मिशन अयोध्या”.

प्रभु श्रीरामाचे वैश्विक रूप प्रदर्शित

साधारण पाचशे वर्षाच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्यामध्ये सरते शेवटी श्री राम जन्मभूमी मंदिर उभारले गेले, त्या घटनेने देशमुख सर प्रभावित होतात. रामजन्मभूमी मंदिर उभारलं गेलं, पण पुढे काय? मंदिर उभारलं पण श्रीरामाच्या विचारांचं काय? असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांनी स्वतःते बेचैन होतात आणि प्रभू श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदर्श

जे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपला आदर्श  आहेत त्या आदर्शांचा आदर्श श्रीराम आहे. अयोध्यात निर्माण झालेले भव्य मंदिर रामराज्याची सुरुवात असायला हवी, पुढच्या पिढ्यांना आदर्श राजा रामाचा इतिहास आपण सांगायला हवा. श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा आहे त्याला कोणताही धर्म, जात-जमात अपवाद नाही. श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा, तिरस्काराचा विषय नाही तर त्याचे स्वरूप वैश्विक आहे.

अत्यंत वेगळा विषय घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी मिशन अयोध्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून हा चित्रपट रसिकांनी चित्रपटगृहातच पहावा असे आवाहन कलावंत तंत्रज्ञानी केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14
Next Post

कदमवाकवस्ती येथे तिहेरी अपघात; दुचाकी चालक गंभीर जखमी, बहिणीच्या लग्नाहून घरी जाताना घडली दुर्घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.