धाराशिव: हातकणंगले मतदारसंघात महायुती आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली असतानाच आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.
या हाणामारीत एका शिवसैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर ३ ते ४ जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. समाधान नानासाहेब पाटील असं हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्या शिवसैनिकाच नाव आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भूम तालुक्यातील पाठसांगवी मतदान केंद्रावर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे गटाचे कार्यकर्ते मतदारांना घेऊन आले होते. काही कारणास्तव दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका शिवसैनिकांचा मृत्यू झाला. समाधान हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. ठाकरे गटाच्या ३ ते ४ कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या २० ते २२ कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.