नांदेड : ग्रामसेवकाने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. ती रक्कम परत केल्यानंतर देखील सावकाराचा व्याजासाठी तगादा सुरूच राहिल्यामुळे सावकारांच्या या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील ग्रामसेवक नारायण कागदे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. ग्रामसेवक कागदे यांनी बारा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ साली १३ लाख ६० हजार रुपये शेत जमीन गहाण ठेवून सावकाराकडून व्याज कर्ज घेतले होते. दरम्यान कागदे यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड केली होती. तरी देखील आरोपी सावकारांने शेती स्वतःच्या नावावर करून दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विक्री करून शेतीचा ताबा देण्यास नकार दिला. अशी तक्रार मयत ग्रामसेवकाच्या भावाने अर्धापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
६ जणांविरुद्ध गुन्हा..
सावकारांचा जाच सहन न झाल्याने ग्रामसेवकाने कागदे यांनी दोन पानाची सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे. मी गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे ग्रामसेवक नारायण कागदे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल आहे. याप्रकरणी सहा आरोपी विरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलीस तपास करता आहे.