छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका क्लासेसची तोडफोड केल्याची बातमी समोर आली आहे. या क्लास चालकाने घेतलेले पैसे परत मिळत नसल्याने बीड जिल्ह्यातील तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या माजलगाव येथील सुदर्शन तौर्य तरुणांन छत्रपती संभाजीनगरमधील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये काही दिवसांपूर्वी ऍडमिशन घेतले होते. त्यावेळी त्याने 58,000 रुपये फी भरली होती. मात्र, आठ दिवसात या तरुणाने क्लासेस सोडले आणि पैसे परत मागितले. परंतु, क्लास चालक पैसे परत देत नसल्याने या तरुणांने माजलगाव येथे राहत्या घरात सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या घटनेनंतर मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्लासेसमध्ये जाऊन तोडफोड केली आहे.
फिस परत न केल्याने तरुणाचे टोकाचे पाऊल..
बीडमधील एका तरुणाने क्लासेस सोडल्यानंतर भरलेली फी परत दिली नाही म्हणून सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली होती. मानसिक स्वास्थ्य चांगलं नसल्याने सुदर्शन तौर्य या तरुणांनं छत्रपती संभाजीनगरच्या आकाश क्लासेसमधून ऍडमिशन रद्द केले होते व भरलेली फीस परत मिळावी यासाठी त्याने वारंवार अर्जही केले होते. या घटनेला पाच महिने होत आले तरी त्यावर काही कारवाई केली नसून फीस परत न दिल्यास पॉयझन घेऊन आपले आयुष्य संपवायचे प्रयत्न करेन. बरे वाईट झाले तर त्याला आकाश क्लासेसचे शिक्षक जबाबदार राहतील अशी सुसाईड नोट लिहित त्यांनी आत्महत्या केली होती.
मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून क्लासेसची तोडफोड..
बीडच्या तरुणाच्या आत्महत्येनंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लासची तोडफोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत क्लासची तोडफोड केली. उद्यापासून हा क्लास सुरू राहणार नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांनी आकाश इन्स्टिट्यूटला जात गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे.