जालना: जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे. मागच्या सहा वर्षांपासून आरोपी आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. कोणाला सांगितलेस तर जीवे मारण्याची धमकी देत होता. याप्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलिस ठाण्यात आरोपी पित्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी बापा विरोधात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या नराधम बापाने २०१८ पासून स्वतःच्याच मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला आहे. मुलीला धमक्या देत आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता.
कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपी देत होता. त्यामुळे मुलीने घाबरून कोणालाही सांगितलं नाही. अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुलीच्या फिर्यादीवरून जालन्यातील मौजपुरी ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मौजजपुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने मुलीवर २०१८, २०२२, २०२३ आणि २०२५ मध्ये बलात्कार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली. या घटनेमुळे जालना हादरले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.