मोंढा (परभणी) : परभणी शहरातुन एक संतापजनक बातमी समोर आली आहे. शहरात वसतीगृहामध्ये वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. तसेच येथीलच तीन मुलींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील सत्कार कॉलनी येथे घडली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरातील वसमत रोडवरील सत्कार कॉलनी येथे एक निवासी वस्तीगृह आहे. येथे हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या वसतीगृहात राहत असलेल्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. तसेच इतर तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग देखील करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत मुलींनी घरी माहिती दिली. यानंतर पालकांनी वसतिगृहात येत विनयभंग करणाऱ्याला पकडले. तसेच याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितास नातेवाईकांची मारहाण..
सदर घटना विद्यार्थिनीने तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली असता घटनेतील संशयित आरोपी विकास मुरलीधर कदम (वय ३१) ह्या वसतिगृह चालकास चोप देत नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून निवासी शाळेतील विद्यार्थीनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.