छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने या मुलीला रेल्वे स्टेशन येथील हॉटेलच्या रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. ट्रेनिंगसाठी मुंबईला जायचे असल्याचे सांगून आरोपीने या मुलीला रेल्वे स्टेशनवर बोलून घेतले आणि हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. शिवाजी जगन्नाथ गोरडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी शिवाजी गोरडे विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत पैठण शहरातील वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगीची राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळासाठी निवड झाली आहे. या मुलीला ती राहत असलेल्या गावातील शिवाजी जगन्नाथ गोरडे ही व्यक्ती खो-खोची ट्रेनिंग देत असे. या मुलीला खो-खोच्या शिक्षकाने मुंबईला ट्रेनिंगसाठी जायचे असल्याचे सांगितले त्याने तिला आपल्याला रात्रीच्या १० च्या ट्रेनने मुबंईला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार पीडित मुलगी रेल्वे स्टेशनला गेली. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला संभाजीनगर रेल्वे स्टेशन रोडवरील हाँटेल पंजाबमध्ये नेले. त्याठिकाणी त्याने एका खोलीमध्ये नेऊन मला तू खूप आवडते असे सांगत पीडित मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार केला.
त्यानंतर आरोपी शिवाजी पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेत गेला. त्याठिकाणी त्याने तिला माझ्यासोबत चल असे म्हणाला. पीडित मुलीने नकार दिल्यानंतर असता तुझ्यासोबत मी जे केलेते मी संपूर्ण गावभर सांगून तुझी बदनामी करेल असे सांगितले. आरोपी हा वारंवार पीडित मुलीला धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आईसोबत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.