छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात आढळून आला आहे. किशोर बाबुराव लोहकरे असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या चालकाला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांधकाम व्यावसायिक किशोर बाबुराव लोहकरे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांची जाळून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गोडवा गावातील जंगल परिसरात आढळून आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून त्यांचा चालक जावेद सत्तार शेख याला अटक करण्यात आली आहे. नेमकी ही हत्या का करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
किशोर लोहकरे हे मुंबई येथे जात असल्याचे आपल्या पत्नीला सांगून 17 सप्टेंबर रोजी घरातून 10 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीचा चालक जावेद सत्तार शेख हा देखील होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलामध्ये आढळून आला आहे. जाळून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. मात्र हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.