Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तिनं माझ्या भावाला घराबाहेर काढलं, आमच्याशी संबंध तोडले’ कुणाल चांदगुडेच्या आत्याचा खळबळजनक आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 24 August 2026, 20:54

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यू प्रकरणात तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे आरोप आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी चांदगुडे कुटुंबीयांच्या घराचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. त्याचदरम्यान कुणालच्या आत्याने कौटुंबिक वादासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत.

कुणालची आत्या शोभा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ मुरलीधर चांदगुडे यांच्याशी कुटुंबाचा जवळपास 25 वर्षे संपर्क नव्हता. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून मुरलीधर पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू लागले होते. मात्र, त्यांना कुटुंबीयांपासून दूर ठेवण्यात आले आणि अखेर घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप शोभा यांनी केला आहे.

मुरलीधर आणि त्यांची पत्नी संगिता यांच्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत संबंध चांगले होते, असेही शोभा यांनी सांगितले. सुमारे चार महिन्यांपूर्वी मुरलीधर एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते. मात्र, संगिता लग्नाला गेल्या नव्हत्या. लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर मुरलीधर घरी परतणार होते. मात्र, त्याच काळात त्यांच्या बहिणीच्या मुलाचे निधन झाले. त्यामुळे ते त्या ठिकाणी आणखी काही दिवस थांबले.

नातेवाईकाच्या मृत्यूनंतर दहाव्याचा विधी पूर्ण करूनच मुरलीधर परतणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने संगिता नाराज झाल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे शोभा यांनी म्हटले आहे. मुरलीधर यांना गावी राहणे पसंत होते, मात्र ही बाब संगिता यांना मान्य नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते आणि अखेर मुरलीधर यांना घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

“आमच्या भावाला संगिताने आम्हाला बोलू दिले नाही. 25 वर्षांनंतर तो गेल्या चार महिन्यांपासून आमच्याशी बोलत होता. मात्र, त्याला घराबाहेर काढण्यात आले,” असा दावा शोभा यांनी केला आहे.

दरम्यान, संगिता यांच्या बहिणीनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. पल्लवी जऱ्हाड यांनी कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्यावा, अशी विनंती केली. त्याचवेळी सुमारे 20 वर्षांपूर्वी मुलाने गाव आणि शेती सोडावी यासाठी त्याच्या डोक्यात फावडे का मारण्यात आले होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या परस्परविरोधी आरोपांमुळे खवड्या डोंगरावरील तिघांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. पोलिसांकडून घराचा पंचनामा, घटनास्थळावरील पुरावे आणि कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस विविध शक्यता तपासत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25
Next Post

पती-पत्नीचा वाद गोळीबारावर! ‘गोळी’ कोणी झाडली? गूढ कायम; पुण्यातील कसबा पेठेत घडली दुर्घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp