Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पती-पत्नीचा वाद गोळीबारावर! ‘गोळी’ कोणी झाडली? गूढ कायम; पुण्यातील कसबा पेठेत घडली दुर्घटना

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 August 2026, 21:18

पुणे : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर गावठी पिस्तुलातून झाडलेली गोळी पतीच्या छातीत घुसल्याची धक्कादायक घटना कसबा पेठेत सोमवारी सकाळी घडली. अभिजीत शिंगोटे (३३) हे गंभीर जखमी झाले असून, गोळी पत्नीने झाडली की पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला, याबाबत दोघांकडून परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने पोलिसांसमोर घटनेचे गूढ कायम आहे.

कसबा पेठेतील गोकुळे वाडा परिसरात शिंगोटे हे भाड्याने राहतात. त्यांचा मोबाइल दुरुस्तीचा व्यवसाय आहे. पत्नीपासून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असून, त्यांची दोन्ही मुले आजोळी राहतात. दोन दिवसांपूर्वी पत्नी पतीकडे आली होती. सोमवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर गोळीबार झाला.

छातीवर गोळी लागल्यानंतर शिंगोटे यांनी दुकानातील एका कामगाराला घरी बोलावून घेतले. त्याच्या दुचाकीवरून ते ससून रुग्णालयात गेले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर फरासखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घरातून गावठी पिस्तूल आणि एक पुंगळी पोलिसांना मिळाली. मात्र, गोळीबार नेमका कसा झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

 

पत्नीने पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे, तर जखमी पतीने पत्नीने आपल्यावर गोळी झाडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे गोळीबाराचा प्रत्यक्ष साक्षीदार नसताना पोलिस तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक तपासातूनच सत्य बाहेर येणार आहे. सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घरातील वाद हातघाईपर्यंत पोहोचणे गंभीरच; पण त्यात थेट बंदुकीचा वापर होणे ही कायदा-सुव्यवस्थेसाठीही धोक्याची घंटा आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25
Next Post

शेतकरी कर्जमाफीचा दुसरा टप्पा पूर्ण! ६ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५,०८६ कोटी रुपयांचा निधी वर्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp