बुलढाणा : समृद्धी महामार्गाच लोकार्पण होऊन जेमतेम एक वर्ष पूर्ण झाले आहे. तोच आता समृद्धी महामार्गावरील काही भाग तुटून पडत असल्याचे दिसत आहे. समृद्धी महामार्गाच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र, अपघातांची मालीकाही भीतीदायक आहे. या मार्गावरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून तो वर आल्याची बातमी समोर आली आहे.
मार्गावरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटला व तो अन्य कारणाने वर आला. गुरुवारी रात्री उशिरा ही गंभीर बाब निदर्शनास आली. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील संभाव्य भीषण अपघात प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला. महामार्गावरून प्रवासाची भीती आनखी वाढली आहे. या
सिंदखेड राजानजीकच्या चॅनेल क्रमांक ३१९ वर मुंबई कॉरिडॉरवर मोठ्या पुलाचा लोखंडी भाग तुटून महामार्गावर आला. या मार्गावरील वाहनांचा वेग १२० किलोमीटर इतका आहे. त्यामुळे मोठा अपघात वा दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. मात्र, एका जबाबदार वाहन चालकाने थांबून याचा ‘व्हिडीओ’बनवून जवळच्या टोल नाक्यावर याची माहिती दिली. त्यामुळे संभाव्य अपघात टळले.