छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात केशरचा तुडवडा होत आहे. त्याचाच फायदा गुकानदार उचलत असल्याच पहायला मिळत आहे. शहरातील काही दुकानदार मूळ किमतीपेक्षा दुपटीने दर वाढवून आणि मुदतीची तारीख वाढवून केशरची विक्री करत आहेत. याच प्रकरणात एका दुकानदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शगरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी येथील दुकानात हा प्रकार घडला. पण दुकानदाराने कंपनीकडे बोट दाखवून हातवर केले. एक महिला दुकानात केशर घेण्यासाठी गेली होती. एका पाकिटावर ३५० रुपये किंमत लावली होती. पण दुकानचालक ते २०० रुपयांना विकतो. याबाबत महिला ग्राहकाला संशय आला. त्यावर तिने केशच्या पाकिटावरील किमतीचे स्टिकर पाहिल ते सहज निघत असल्याचे तिला कळले, ते काढले असता त्या महिलेला मूळ केशरची किंमत १८० रुपये असल्याचे दिसले. तसेच केशर वापरण्याची मुदत डिसेंबर २०२४ होती. ती बदलून जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती.
कायद्याने गुन्हा
केशरची किरकोळ बाजारात गुणवत्तेनुसार प्रतिग्रॅम ३०० ते १,५०० रुपयांपर्यंत विक्री होते. आरोग्यवर्धक केशरला ग्राहकांकडून मागणी असते. केशरसारख्या पदार्थांची विक्री करण्यासाठी विशिष्ट मुदतीचा कालावधी असतो. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वावर मुदतीची तारीख पाकिटावर नमूद असते. तारीख उलटून गेल्यास त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही मुदत वाढवून केशर विकण्याचे प्रकार सुरू आहेत.
दुकानदाराचे कानावर हात
या प्रकाराबाबत दुकानमालक दीपक बादशहा यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी ‘यात दुकानाचा काही संबंध नाही. आम्हाला त्या स्टिकरसह कंपनीकडूनच माल विक्रीसाठी देण्यात येतो. हा प्रकार मला आताच समजला’, असे स्पष्टीकरण दिले.