हिंगोली : हिंगोली जिल्ह्या धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज पहाटे दोघांनी रेल्वेखाली उड्या घेत आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. यामध्ये हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वसई गावातील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. तर दुसरा व्यक्ती हा बोडखी गावातील संदीप प्रकाश हनवते असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही घटनांमुळे हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महापुर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतातील पिके वाहून गेल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसह पिके खरडून गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? या चिंतेतून हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वसई गावातील अल्पभूधारक शेतकरी गंगाधर सातपुते (वय ३७) यांनी आज सकाळी वसई शिवारात मालगाडी पुढे उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे.
शेतात गुरांसाठी चारा आणायला जातो म्हणून..
कापला गंगाधर सातपुते हे सकाळी कुटुंबाला शेतात गुरांसाठी चारा आणायला जातो म्हणून आले होते. शेतातील गुरांचा चारा देखील त्यांनी कापून घराकडे येण्याचं नियोजन केलं होतं, मात्र अचानक पुराच्या पाण्याने शेतीचे झालेलं नुकसान त्यांना पाहवत नसल्याने त्यांनी आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलले. अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.