छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात जिओ सहित वोडाफोन, बीएसएनएल आदी मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. रिचार्ज करूनही उपयोग होत नसल्याने मोबाईलचा वापर करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
ग्रामीण भागात सुरुवातीलाच जेव्हा मोबाईल टॉवर उभारण्यात आले. तेंव्हा नेटवर्क सेवा सर्वांना व्यवस्थित मिळत होते. जसजसे अन्य मोबाईलचे नेटवर्क सुरु झाले. तसतसे सर्वच मोबाईल कंपनीचे नेटवर्क स्लो होत गेले. अगोदर गावाच्या प्रत्येकांच्या घरांच्या कानाकोपऱ्यात नेटवर्क काम करत होते. मात्र आजची स्थिती आशी आहे की, आता नेटचा वापर करायचा तर घराच्या बाहेर यावे लागते. येथील मोबाईल कंपनीच्या टॉवर ऑफिसमधील इलेक्ट्रिक मशीनचे कंपनीकडून कुठल्याच प्रकारचे मेंटेनन्स केल्या जात नाही. त्यामुळे मशिनची कार्यक्षमता कमी झाली आहे.