औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज निवृत्तीचा घोषणा केली आहे. मी फक्त ही लोकसभा निवडणूक लढविणार आहे. पुढची लोकसभा लढविणार नाही, पुढच्या लोकसभेला अंबादास दानवे किंवा पक्ष जो उमेदवार निवडेल त्याने ती लढवावी, असं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार? यावरुन सुरुवातीला जोरदार चर्चा सुरु होत्या. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोघांची नावे चर्चेत होते. पण पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता दोघांची दिलजमाई झाली असून दोघेही प्रचाराला लागले आहेत. अशातच आज चंद्रकांत खैरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या राजकीय निवृत्तीची मोठी घोषणा केली.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
मी फक्त आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहोत. पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, पुढची लोकसभा निवडणूक अंबादास दानवे किंवा पक्ष जो उमेदवार निवडेल त्याने ती लढवावी. मी फक्त पुढील पाच वर्षे लढणार आहे. २०२९ च्या निवडणुकीला मी उभा राहणार नाही. अनेकांचे आमच्याकडे लक्ष आहे, मात्र, विरोधक काय हालचाली करत आहेत, याकडे आमचे लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यांचे जनतेकडे लक्ष नाही. ते फक्त आमदारांकडे लक्ष देत आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
शरद पवार, प्रियांका गांधी येणार प्रचाराला
शरद पवार आणि प्रियांका गांधी या प्रचाराला येणार आहेत असंही खैरे यांनी यावेळी सांगितले. 1989 पासून या शहराला शांत ठेवले आहे. इम्तियाज जलील यांनी कोणतं काम आणलं ते मला सांगा. त्यांना दिल्लीही माहिती नाही. भागवत कराड यांनाही दिल्ली माहीत नाही. आमच्याकडचे 5 ते 6 गद्दार आहेत, त्यांना आता तिकीटपण भेटलं नाही. ते आता रडत बसले आहेत, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.