Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बीडमध्ये एकाच मंचावर बहीण-भाऊ; पहिल्यांदाच एकमेकांवर स्तुती सुमने

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 17:50

बीड : बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकाच मंचावर आले होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दोन्ही भावाबहिणींनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळली. पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकमेकांवर मुक्तकंठाने स्तुती करत होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, यापुढे पंकजाताई आणि मी मिळून बीडचा विकास करणार आहोत, हे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना धनंजय मुंडे यांची स्तुती केली. मला मीडियाने विचारलं ताई तुम्ही या कार्यक्रमाला आलात हे प्रमुख आकर्षण आहे का? मी म्हटलं, मंचावर सर्व आमदार आहेत. त्यामध्ये माझा संवैधानिक रोल नाही. पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी काम केलं.

परळीची सेवा करताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं मनात वाटायचं. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा या कामाचं बीजारोपण केलं. धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते. आता ही योजना पुढे जाईल. अत्यंत चांगलं काम या माध्यमातून झालं पाहिजे. या वैद्यनाथाचा आशीर्वाद आपल्याला लाभला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड जिल्ह्याचं कर्ज माझ्या आणि धनंजयच्या डोक्यावर

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी माझी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी आहे. हे दाखवण्यासाठी आले. मी जात धर्म पाहत नाही. कोणत्याही पक्षाच्या लोकांना त्रास दिला नाही. द्वेष मनात ठेवला नाही. या जिल्ह्याचं कर्ज माझ्या आणि धनंजयच्या डोक्यावर आहे. विकास तुमच्या पदरात देणं हे आमचं कर्तव्य आहे. आज परळीच्या विकासासाठी वंचिताचा वाली बनण्यासाठी खांद्याला खांदा लावून लावून काम करू, असं पंकजा मुंडे म्हणल्या.

 

माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला : धनंजय मुंडे

यावेळी धनंजय मुंडे यांनीही जोरदार भाषण करत पंकजा यांचं तोंडभरून कौतुक केलं. जीवनात अनेक सभा आणि कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. व्यासपीठावरील सर्वांना बोलावं असं वाटेल असा हा कार्यक्रम आहे. एवढी गर्दी पाहिल्यावर तोंडातून शब्द फुटू नये इतकी गर्दी आहे. माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला, असं धनंजय मुंडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, बीड जिल्ह्यातील 36 हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. या तिघांमुळे 1400 कोटीचा निधी आला. यापूर्वी एवढा निधी कधी आला नाही. एवढा निधी दिला त्यासाठी आभार मानतो. बीडच्या मागे ताकदीने उभे राहिला आहात. विकासाची गंगा तुम्ही देत आहात. थोडेसे आणखी हात ढिला करा. हा बीड जिल्हा मागास जिल्हा आणि ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही, एवढा आम्ही विकास करू, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार २ हजार रुपये! राज्य सरकारची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Wednesday, 14 October 2026, 16:54

हाताला फ्रॅक्चर आणि उपचारादरम्यान मृत्यू ! दोन महिने झाले मग, पूजा गई यांना न्याय कधी?

Wednesday, 14 October 2026, 16:46

MPSC सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियारांकडे; पुण्यातील आंदोलनाला यश, आता पुढे काय?

Wednesday, 14 October 2026, 16:33

उरुळी कांचन पोलिसांना धक्काबुक्की करून शासकीय गाडीची केली तोडफोड! महात्मा गांधी शाळेच्या गेटसमोरील घटना

Wednesday, 14 October 2026, 16:23

NEET पेपरफुटीचा मोठा खुलासा! 14 व्या आरोपीवर आरोपपत्र; पेपर आधीच मिळवून विद्यार्थ्यांकडून वसूल केले पैसे

Wednesday, 14 October 2026, 15:44

मंत्रिमंडळ बैठकीतले धडाकेबाज निर्णय! जमीन महसूल अन् शेगाव देवस्थानासाठी मोठी घोषणा; नेमकं काय बदललं? वाचा सविस्तर…

Wednesday, 14 October 2026, 15:28
Next Post

प्रा. जयश्री गटकुळ ऑल इंडिया लिनेस क्लबच्या स्टार पुरस्काराने सन्मानित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp