बीड: काही दिवसांवर खरीप पेरण्या येऊन ठेपल्या असून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी, शेती मशागतीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना बैलाची गरज असल्यामुळे सध्या परिसरात शेतकऱ्यांकडून बैलाची मागणी वाढली आहे. त्या प्रमाणात बैल बाजारात सध्या बैल विक्री करणाऱ्यांपेक्षा बैल खरेदीदार जास्त झाल्याने विक्रीसाठी बाजारांत येत नसल्यामुळे बैल ‘बाजार तेजीत चालू आहे.
सध्या बैल बाजारामध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी किंमत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे बैल खरेदीदार सांगतात. शेती नांगरणीचे काम आटोपल्यानंतर लहान-सहान शेतकरी दरवर्षी बैल विकतात व पेरणी जवळ आली की बैल खरेदी करतात. मात्र यावर्षी चारा, पाणी टंची असल्याने बैलांच्या किमती कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बैलासाठी लागणारा चारा, पाणी टंचाई असली तरी बैलजोडीने शेती नांगरणी व वखरणीसाठी शेतीच्या मशागतीला लागणाऱ्या बैलजोडीची मागणी वाढल्याने हल्लीच्या काळात यंत्राच्या सहाय्याने शेतीची बरीच कामे उरकली जातात. परंतु, कमी शेती असलेले शेतकरी आपल्या शेतीच्या लागवडीचे क्षेत्र वाढावे म्हणून शेतातील कामे बैलजोडीच्या सहाय्याने व्यवस्थित नांगरूण, वखरूण पाहिजे तशी शेतीची मशागत करून घेतात.
सध्या बैल बाजारात साधारण बैलांची किंमत ५० हजारांपासून १ लाखांपर्यंत आहेत. बैल बाजारात विक्री करणाऱ्या पेक्षा खरेदीदार जास्त दिसून येत असल्याने सध्या मिळेल त्या किमतीत बैल खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.