बीड : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने आम्हाला असे वाटत आहे की, ते महाविकास आघाडी सोबत जाणार नाहीत. ते आमच्या सोबत स्वतंत्र लढतील. आमच्या सोबत जर स्वतंत्र लढले तर ओबीसींची आणि दलितांची ताकद ही राज्यात यंदा निर्णायक ठरेल, असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले. मराठे भाजपला मतदान करणार नाहीत. गावोगावी निषेध केला जाईल आणि अगदी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा आमची रणनीती तयार करत आहोत. ओबीसीदेखील मराठ्यांना मतदान करणार नाही. जो ओबीसी इतकी बात करेगा वही देश मे राज करेगा, असा इशाराही त्यांनी दिला.