छत्रपती संभाजीनगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे काही दिवस झाले उपोषण सूरु आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या भेटीला येत आहेत. लक्ष्मण हाके यांची तब्बेत खालावत असून ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. ओबीसी आंदोलबाबत आता अनेक आरोप प्रत्यारोप होत असल्याचे, दिसून येत आहेत.
त्यातच आता लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याच मनोज जरांगेंनी यावेळी सांगितलंय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पुढे मनोज जरांगे म्हणाले, भारतात लोकशाही आहे. त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते समाजाची दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करायची ती करू द्या. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC-ST ला धक्का लागणार नाही, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.
त्याचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच लक्षात येते. लक्ष्मण हाकेच्या आंदोलनावर मनोज जरांगे म्हणाले, माझा त्यांच्या आंदोलनाला बिलकुल विरोध नाही. मी त्यांच्यावर उत्तर देणार नाही. मी किती वेळेला पाडा म्हणालो ते सांगा.
आत्महत्या करू नका : मनोज जरांगे
मराठा तरुण आत्महत्या करत आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, कि राज्यातील तरुणांना हात जोडून विनंती की, कधी न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. नंबर लागला नाही आत्महत्या करू नका. पुन्हा प्रयत्न करा, काही दिवसांनी तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. तेव्हा पुन्हा प्रयत्न करा. मी आरक्षण मिळवून देणार आहे. नोकरी हुकली तरी चालेल मात्र तुमचा जीव महत्वाचा आहे.