धाराशिव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धाराशीव लोकसभेच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. माझा नवरा भाजपचा आमदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असं वक्तव्य अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील प्रचारासाठी बार्शीमध्ये आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला, बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. त्यामुळं आपण बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? यावर बोलताना मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं त्या म्हणाल्या.
धाराशीव लोकसभा मतदारसंघातून अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार करण्यासाठी अर्चना पाटील आज बार्शीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं वक्तव्य केलं आहे. अर्चना पाटील यांच्या या वक्तांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अर्चना पाटील यांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटलं आहे.