Nanded Crime नांदेड : अर्धापूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा एका आठ वर्षाच्या मुलीवर एका माथेफिरूने अत्याचार केले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
पीडित मुलीने आईला सांगितले
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर त्याच्या गावातील एका माथेफिरूने शुक्रवारी रात्री अत्याचार केले. सुरूवातीला मुलीला हा काय प्रकार होतोय समजले नाही. घरी गेल्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला झालेल्या घटनेची माहिती दिली. घडलेला सर्व प्रकार समजताच मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा गुन्हा पोक्सो अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा’ म्हणजेच पोक्सो अंतर्गत नोंदवला जातो. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद तसंच जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. 18 वर्षांखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद मजबूत करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला. दुरुस्तीही करण्यात आली.