Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 April 2026, 19:45

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात उघडकीस (Hingoli News) आलेल्या एका खून प्रकरणाने खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या स्वतःच्या मुलाचाच आईने सुपारी देऊन खून (Hingoli Crime) केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला तो मृत तरुणाच्या हातावरील टॅटूमुळे. (Latest Marathi News)

दोन दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. चेहरा ओळखता येणार नाही अशा अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. अशा वेळी पोलिसांनी मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले.

 

या तरुणाच्या हातावर दोन ठळक टॅटू होते. एक टॅटू आई-वडिलांबद्दल होता, तर दुसरा एका पावलाचा टॅटू होता. याच टॅटूमुळे अखेर या मृतदेहाची ओळख पटली. मृत तरुणाचे नाव सचिन रामकिशन राजगुरू असून तो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वढव गावचा रहिवासी असल्याचे समोर आले.

ओळख पटताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. सचिनच्या आईचे गावातील रामदास तनपुरे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये सचिन अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.

या कटानुसार आई आणि तिचा प्रियकर यांनी नरेश पवार याला 25 हजार रुपयांची सुपारी दिली. नरेश पवार याने सचिनला पाहुण्याकडे जाण्याचा बहाणा करून साखरा परिसरात नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजून मद्यधुंद केले आणि जामदया शिवारात निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला.

मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी चेहरा विद्रूप करण्यात आला होता. मात्र हातावरील टॅटूमुळेच या गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी आई, तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्या आरोपीला अटक केली असून तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात टॅटूच हा महत्त्वाचा पुरावा ठरला आणि त्याचमुळे पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावता आला.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46
Next Post
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.