लातूर : लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वर्गशिक्षकाने १६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या एका गावातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकाने १६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली. विनयभंग केल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
अण्णा श्रीरंग नरसिंगे असं आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आरोपी विद्यार्थिनीसोबत अश्लील बोलत होता, अपमानास्पद बोलून असभ्य वर्तन करत होता. तसेच त्यांचा विनयभंग करत होता, असे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत अधिकचा तपास एमआयडीसी पोलिस अधिकारी करत आहेत.