जालना: मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या पार पडणाऱ्या बैठकीनंतर शांतता महारॅलीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. मनोज जरांगे पाटील यांनी २० तारखेपासून आमरण उपोषणाचा करण्याचा सरकारला इशारा दिला आहे.