छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हे देखील पूर्ण केला आहे. खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना ही घोषणा केली आहे.
मात्र, स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदर देखील सांगितले होतं की, आम्ही तयारी करत आहे. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही, पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत असल्याचे जरांगे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शोध घेत आहोत. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली
127 मतदारसंघात पहिला सर्व्हे केला आहे. इतर मतदारसंघात आणखी दुसरा सर्व्हे करणार आहे. सरकारने आरक्षण दिले नाही तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. पण, मी स्वतः निवडणूक लढवणार नसून मी सर्व मतदारसंघात जाणार आहे, 6 जुलैपासून मराठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे, असंही मनोज जारांगे यांनी सांगितले.
अशी असणार जनजागृती रॅली
6 जुलै हिंगोली
7 जुलै परभणी,
8 जुलै नांदेड
9 जुलै लातूर
10 जुलै धाराशिव
11 जुलै बीड
12 जुलै जालना
13 जुलै संभाजीनगर