Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर राजकारणात एन्ट्री केली आहे. मनोज जरांगे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत सवांद साधला, यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, आपण कुठं निवडून येऊ शकतो. दलीत मुस्लिम एकत्र आहे, ते पाहुयात. मी समीकरण जुळवत आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या. फॉर्म मागे घ्यायच्या रोजी आपण सांगू. फॉर्म कुणाचा मागे घ्यायचा, असे मनोज जरांगे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, प्रत्येक मतदारसंघात १ लाख मतदान आहे. कुणाला लीड तुटते. कोणत्याच पक्षा नेत्याकडून बोलू नका, समाजाकडून बोला. आंदोलन उघडे पडू देणार नाहीत हे सांगा. मला माझ्या समजासाठी आंदोलन करायचे आहे. मविआ आणि महायुती आरक्षण देतो म्हणत नाहीत. महायुती, मविआने अजून यादी जाहीर केली नाही. पण, जर आपलं ठरले तर दोघांचा कार्यक्रम करायचा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पुढे म्हणाले, मला एकटे पडू देऊ नका. जिथं निवडून येतील तिथं उमेदवार उभे करावे. SC, ST च्या जागी उमेदवार देऊ नका. तिथं आपल्या विचारांच्या माणसाला मते देऊ. जिथं उभे करणार नाही, पण जो आपल्याला ५०० रुपयाच्या बाँडवर लिहून देईल, त्याला मतदान देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
उभे करायचे की पाडायचे ? मनोज जरांगे
जो आपल्या विचारांचा आहे, त्याला मत द्यायला काय हरकत आहे? उभे करायचे की पाडायचे? असा सवाल देखील यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला विचारला. यावेळी सर्वांनी एकच लढण्याचा निर्धार केला. माजी निवडणुकीकडे जायची इच्छा नाही, पण मी समाजाच्या पुढे नाही. समाजाचे जे म्हणणं ते माझं आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी खो दिला.
माझी राजकारणात जायची इच्छा नाही
आपण राजकारणात जाऊ नये, असं माझं म्हणणं आहे. पण तुम्ही सर्वांनी पाडायचे की उभे राहायचे ठरवा. माझी राजकारणात जायची इच्छा नाही. जर उभा करायचं ठरलं तर माझे प्रश्न आहे. उभा करायच्या नादात माझ्या समाजाचा प्रश्न मागे राहील. राजकारण झाले तर माझा समज पुन्हा एकत्र राहील का? महाविकास आणि महायुतीवाले सगळे सख्खे मावस आहेत. आपण उभे राहिले की भाजप वाले खुश होतील. आणि उभे नाही केले तर माहाविकास आघाडी वाले खुश होतील, असे जरांगे म्हणाले.