जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात समारोप पार पडला. यावेळी त्यांनी ओबीसी आमदारांना मत करणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा, असं आव्हान मराठा समाजाला केलं आहे. तसेच मंडल कमिशन बरखास्त होऊ शकतं, मला ओबीसीच वाटोळं करायचं नाही. असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे म्हणाले, 20 तारखेला स्थगित केलेल उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. त्या दिवशी उमेदवार द्यायचे का नाही हे ठरवणार असून सरकारला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. पुन्हा 20 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे. सरकारला आमचं सांगणे आहे, आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणाचे काही देणेघेणे नाही. 18 आणि 19 तारीख दोनच दिवस माझ्या हातात आहेत. मी उद्याच निर्णय घेणार होतो, पण उद्या दर्शनाला जात आहे. सरकारने आज रात्री विचार करावा. असंही जरांगे यांनी सांगितलं.
सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केला आहे. याला एक तर बदनाम करा नाहीतर घातपात करा. छगन भुजबळ तू पायावर चालतो मी डोक्यावर चालतो. ही फक्त मराठवाड्यातील गर्दी… गिरीश महाजन सारख्याना हरवणे सोपे नाही, प्रत्येक वेळेस सरकार फसल आहे, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं.
पुढे बोलताना म्हणाले, ज्याच क्षेत्रच नाही ती लोक बैठका लावत आहेत. मला आणखी एक डाव टाकूद्या, गिरीश महाजनला बेल्ट लावायला देखील वेळ मिळणार नाही. नुसता मराठवाडा निघाला तर यांचे दंडुके काहीच काम करणार नाही. 20 तारखेला तारीख जाहीर करू, त्या दिवशी 288 पाडायचे की उभे करायचे आणि मुंबई ला कधी जायचे हे ठरवू, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.