बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. जुने एसआयटी पथक बरखास्त करून त्याजागी नवीन पथक स्थापन करण्यात आले आहे. एसआयटी पथकामधील अनेकांवर आरोप करण्यात आले होते. जुन्या एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांचे फोटो खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत दिसून आले होते. त्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता जूनी एसआयटी बरखास्त करून नवीनची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.
जुन्या एसआयटी पथकामध्ये एकूण ९ अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता, मात्र आता नवीन एसआयटी पथकात ९ ऐवजी ६ जणांचा समावेश करण्यात आला आहे. उप महानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख कायम राहणार आहेत.
नव्या एसआयटीत नेमकं कोण-कोण असणार?
किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर) अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड) सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड) अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे) शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे) दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)