Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 19:57

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीला आता वेग आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या सुरक्षेबाबत, म्हणजेच ‘चेन ऑफ कस्टडी’वर आपला युक्तिवाद पूर्ण केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकिलांनी पुराव्यांच्या साखळीबाबत न्यायालयासमोर सविस्तर बाजू मांडली. गुन्हा घडल्यापासून फॉरेन्सिक तपासणी आणि त्यानंतर न्यायालयात पुरावे सादर करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर भौतिक आणि तांत्रिक पुरावे सुरक्षितपणे जतन करून हस्तांतरित करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला.

पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फेरफार किंवा छेडछाड झालेली नसल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या प्रकरणातील ‘चेन ऑफ कस्टडी’ कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला.

सरकारी पक्षाने आपला युक्तिवाद पूर्ण करताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन साक्षीदार आणि पुराव्यांची तपासणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. मूळ खटल्याच्या सुनावणीला गती मिळावी, यासाठी ही प्रक्रिया लवकर सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची प्रतिक्रिया उमटली होती. या हत्येमागे राजकीय वाद असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली असून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे बीड जिल्ह्यासह राज्यातील नागरिक आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘माझ्या बहिणीची छेड काढतो का?’ जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

Monday, 21 September 2026, 20:01

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

Monday, 21 September 2026, 19:57

‘मी CBIचा अधिकारी आहे’ सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत १०० कोटींचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Monday, 21 September 2026, 19:14

सूर्यनमस्कारातून आरोग्याचा संदेश; यथार्थ योग स्टुडिओच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Monday, 21 September 2026, 18:46

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी वंदना काळभोर

Monday, 21 September 2026, 18:36

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला” ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

Monday, 21 September 2026, 18:24
Next Post

'माझ्या बहिणीची छेड काढतो का?' जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp