जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती या सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिली. तसेच शिष्टमंडळांने मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीचीही चौकशी केली आणि त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे आहेत. त्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली. यावेळी मंत्री महाजनांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला. त्यावर आतापर्यंत सबुरी घेऊनच राज्य सरकारला एकूण तीन महिन्यांचा वेळ दिल्याचं जरांगे म्हणाले
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला. त्यावर आतापर्यंत सबुरी घेऊनच राज्य सरकारला एकूण तीन महिन्यांचा वेळ दिल्याचं जरांगे पाटील म्हणाले. त्यावर राज्य सरकार वेगाने काम करत आहे, टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आणखी जरा वेळ द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. काम अंतिम टप्प्यात आलं आहे, सरकार काहीही लपवत नाही असंही महाजन म्हणाले. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, सरकार वेगाने काम करतंय त्यामुळेच आतापर्यंत 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत, पण सरकारने ठरल्याप्रमाणे केलं पाहिजे ही आमची मागणी आहे.