छत्रपती संभाजीनगर : सध्या केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेत वाहनचालकांविरोधात विधेयक मंजूर झाले आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला जर रुग्णालयात पोचवले नाही तर चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. याविरोधात वाहनचालक संतप्त झाला असून आगामी काळात काय घडते हे पाहणं गरजेच ठरणार आहे.
केंद्र सरकारने अपघातग्रस्त वाहनचालकाच्या विरोधात एक नवीन कायदा लागू करण्याचे ठरवले आहे. यामध्ये अपघाताचे दोन भाग करण्यात आले. चुकीने अपघात झालाच तर अपघातग्रस्ताला रुग्णालयात किंवा पोलिस ठाण्यात नेणे बंधनकारक आहे.अपघातग्रस्ताला जागेवर सोडून पळ काढला तर हीट ॲण्ड रन म्हणून चालकाला तब्बल दहा वर्षांच्या शिक्षेसह दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा जाहीर केली.
लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्याने चालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. ऑल इंडिया मोटार काँग्रेस, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनांसह विविध संघटनांनी चक्का जाम करण्याची तयारी सुरू केली. याबाबत रविवारी (ता.३१) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.