छत्रपती संभाजीनगर : शहरातील रॉक्सी टॉकीजचे मालक तथा माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या खून प्रकरणातील आरोपी इम्रान मेहंदीसह आठ आरोपींची विशेष न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची व कलम ३६४ अन्वये सात वर्षांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट व न्या. एन. पी. धोटे यांनी कायम ठेवली. सलीम कुरेशी यांचे ५ मार्च २०१२ रोजी अपहरण करून इम्रान मेहंदी व त्याच्या इतर साथीदारांनी निघृण खून केला. त्यानंतर मृतदेह पडेगाव येथील कासंबरी दर्गा शिवारातील डोंगर पायथ्याशी पुरून ठेवला होता. याप्रकरणी इम्रान मेहंदी, सव्यद नाजेर अली, शेख इम्रान, सव्यद जहीर ऊर्फ शेरा, नुमान खान, जुबेर खान, हबीब खालेद व फरीद खान यांना जन्मठेपेची व सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.