लातूर: जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा या खेड्यातील शिवारात सुरू असलेल्या ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या पथकाने या कारखान्याला वित्तपुरवठा करणारा आणि येथील तयार केलेल्या ड्रग्जच्या वितरणाची भूमिका निभावणाऱ्या दोघांना अटक करून चाकूर न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी हा मुंबई पोलिस दलातील कर्मचारी आहे.
लातूर जिल्ह्यातील रोहिणा (ता. चाकूर) शिवारात सुरु असलेल्या बेकायदेशीर मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज फॅक्टरीवर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने छापा टाकून नुकतीच मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ११.३६ किलो मेफेड्रोन, प्रयोगशाळेतील उपकरणे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून, बाजारमूल्य सुमारे १७ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. ही फॅक्टरी मुंबईत कार्यरत चाकर तालुक्यातील रोहिणा येथील मूळ रहिवाशी असलेल्या पोलिस हवालदार प्रमोद केंद्रेच्या शेतात चालवल होता. या प्रकरणी पोलिस हवालदारासह वित्त पुरवठाधारक, वितरक व इतर-४ अशा एकूण ७ जणांना अटक केली.
अंमली पदार्थ प्रकरणात तपास करताना मुंबईत वितरित होणाऱ्या मेफेड्रोनचा स्रोत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असू शकतो, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालय पथकाच्या मुंबई विभागाला मिळाली. या आधारावर गुप्त माहिती संकलित करून मुंबई व पुणे युनिटने संयुक्तपणे कारवाईची रूपरेषा आखली. या पथकाने लातूर जिल्ह्यातील रोहिणा येथील एका शेतावर छापा टाकला. येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुसज्ज ड्रग्स फॅक्टरी आढळली. तपासात ही जमीन प्रमोद केंद्र या पोलिस हवालदाराच्या नावावर असल्याचे समोर आले. केंद्रे हा नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत आहे
या प्रकरणी या गुन्ह्यातील प्रमोद केंद्रे, महंमद शेख, जुबेर मापकर, आहाद मेमन, अहमद खान या आरोपींना चाकूर न्यायालयाने १५ दिवसाची कोठडी सुनावली असताना महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने याच गुन्ह्यातील दिलावर अल्ताफ खान (वय ३२ वर्ष, रा. सांताक्रूझ, मुंबई) व वसीम इशरात शेख (४० वर्षे रा. मिरा रोड ठाणे) या दोन आरोपींना गुरुवारी चाकूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
जप्त मुद्देमाल
११.३६ किला मेफेड्रान, रासायनिक प्रक्रिया करणारे प्रयोगशाळेतील उपकरणे, फॉर्म्युले, केमिकल्स आणि साठवणूक साहित्य ड्रग्स पकिंगसाठी आवश्यक प्लास्टिक पाउचेस व स्केल्स हे सर्व साहित्य अत्यंत व्यावसायिक पद्धतीने वापरात आणले जात होते, असा संशय संबंधित यंत्रणेला आहे.
प्रमोद केंद्रे आठवड्यात २ ते ३ दिवस गावाकडे
ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी असलेला पोलिस हवालदार प्रमोद केंद्रे हा मुंबई येथे पोलिस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. तो चाकूर तालुक्यातील रोहिणा गावाचा रहिवाशी आहे. त्याच्या स्वतःच्या शेतात पंत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्सची निर्मिती करायचा. येथून तो, मुंबई, पुणे यासह इतर शहरात ड्रग्स पुरवत होता. हा पोलिस हवालदार मुंबईवरून गावाकडे त्याच्या महागड्या कारने आठवड्यातून दोन ते तीन दिवस येत असे. या प्रकरणातील इतर आरोपींना ड्रग्सचे साहित्य पुरवायचा, अशी माहिती पुढे आली आहे.