Monday, June 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जालन्यातील लाडक्या दाजीने लाडकी बहीण योजनेचे 7500 रुपये सरकारला केले परत; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 10 December 2024, 19:46

जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात नंबर वन ठरली आहे. राज्यातील जवळपास अडीच लाख महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी अनेक महिलांनी तासंतास रांगा लावून अर्ज भरले. यातील बहुतांश महिलांना 5 हफ्त्यांचे एकूण 7500 रुपयेही थेट बँकेत जमा देखील झाले आहेत. दरम्यान, काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण बनून या योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता जालन्यातील एका लाडक्या भावाने बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊन कमावलेला 7 हजार 500 रुपये परत केले आहेत.

महाराष्ट्रातील जालन्यात हा प्रकार घडला. जालन्यातील जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेल्या विलास भुतेकर यांच्या पत्नीकडून लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरताना नजरचुकीने विलास भुतेकर यांचं आधार कार्ड अपलोड झाले होते. दरम्यान, 5 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते. मात्र, आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत केले आहे.

याबाबत बोलताना विलास भुतेकर म्हणाले कि, बायकोचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अनावधानाने माझा आधार क्रमांक लिहिला गेला. माझं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे. त्यामुळे माझ्या खात्यावर साडे सात हजार रुपये आले. त्यानंतर मी बँकेत चौकशी केली. पुढे आम्ही कलेक्टर ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना लाडकी बहीणी योजनेचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले. पाच डिसेंबर रोजी पैसे आले. ते आम्ही परत केले.

 

लाडक्या बहिणींना लागली धास्ती

दरम्यान, महायुतीला राज्यात तब्बल 237 जागांवर विजय मिळाला असून 132 जागांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची आता तपासणी होणार असून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे जमा करत, खोटी व बनावट कागदपत्रे जमा करत ज्यांनी पैसे लाटले त्यांचे अर्ज बाद केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना धास्ती लागली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पोट गच्च होणे किंवा फुगणे या त्रासाने त्रस्त आहात? जाणून घ्या प्रभावी घरगुती उपाय

Sunday, 28 June 2026, 21:17

प्रेमासाठी दुबईला गेली अन् थेट तुरुंगात पोहोचली! 23 वर्षीय इन्फ्लूएन्सरवर प्रियकराच्या हत्येचा आरोप

Sunday, 28 June 2026, 21:05

घोटाळे करून संपत्ती जमवली; ओमराजेंवर संजय राऊतांचे गंभीर आरोप, राजकारण तापलं

Sunday, 28 June 2026, 20:18

आईचे निधन झाल्याचे कळताच 25 वर्षीय मुलाने घेतला गळफास; एकाच वेळी माय-लेकावर अंत्यसंस्कार

Sunday, 28 June 2026, 18:51

वीजबिलाची चिंता संपली! लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sunday, 28 June 2026, 18:28

मोहरम मिरवणुकीत मोठा घातपात! 14,900 विषारी कॅप्सूल जप्त; आरोपीने Google-AI वर सर्च करून केली होती तयारी?

Sunday, 28 June 2026, 16:38
Next Post
matheran temperature dropped tourist increased

माथेरानचा पारा घसरला; गुलाबी थंडीत बहरतेय माथेरानचे पर्यटन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.