Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माथेरानचा पारा घसरला; गुलाबी थंडीत बहरतेय माथेरानचे पर्यटन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 December 2024, 19:50
matheran temperature dropped tourist increased

माथेरान: थंड हवेचे ठिकाण म्हणून बिरुदावली असलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान हे संपूर्ण परिचित आहे. या पर्यटनस्थळी तापमानाचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. येथील तापमान ११.२ अशांवर गेल्याने गुलाबी थंडीत माथेरानचे पर्यटन बहरत असून पर्यटक याचा मनमुराद आनंद घेत आहेत.

समुद्रसपाटीपासून २,६३६ फूट उंचीवर असलेले प्रदूषणमुक्त, वाहनमुक्त पर्यटनस्थळ माथेरानमध्ये गुलाबी थंडी पसरली असल्याने पर्यटक या थंडीचा मनमुराद आनंद घेत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ७ आणि ८ डिसेंबरला विकेंड असल्याने हे पर्यटनस्थळ पर्यटकांनी बहरले.

शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत १३ हजार पर्यटक येथे दाखल झाले होते. यादरम्यान रविवारी थंडी वाढू लागली. या गुलाबी थंडीत पर्यटकांनी माथेरान फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान, मक्याचे कणीस, भजी आणि चहा तसेच मॅगीच्या दुकानांवर गर्दी दिसून आली. उंच झाडे असल्यामुळे गुलाबी गारवा अंगावर घेत पर्यटक माथेरानमधील बाजारपेठ मनसोक्त फिरताना दिसत होते.

रविवारी येथील तापमान ११.२ अंशावर पोहोचल्याने पर्यटकांसह नागरिक उबदार कपडे परिधान करून फिरताना दिसले. माथेरानचा पारा दर दिवशी घसरत असल्याने येथील पर्यटन आणखी खुलेल, असा अंदाज येथील व्यावसायिकांनी बांधला आहे. मुंबई-पुण्यापासून माथेरान हे पर्यटनासाठी जवळ असल्याने ही गुलाबी थंडी राहिली, तर पुढील काही दिवस पर्यटकही वाढतील, असा विश्वास येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! शिवाजीनगर बसस्थानकाचा विकास मार्गी; उभारणार अत्याधुनिक बस पोर्ट

Thursday, 5 November 2026, 10:23

दौंडचा चेहरामोहरा बदलणार? 2,400 एकर वनक्षेत्रासाठी मोठा प्लॅन; तलाव, बिबटे अन् पर्यटनावर विशेष लक्ष

Thursday, 5 November 2026, 10:01

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

Thursday, 5 November 2026, 9:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास थंडावला? 15 दिवस उलटले, तरी गूढ कायम; 3 निकटवर्तीय फरार!

Thursday, 5 November 2026, 9:51

सिग्नलमध्ये छेडछाड, ट्रेनवर दगडफेक अन् दरोड्याचा प्रयत्न! महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अलर्ट

Thursday, 5 November 2026, 9:15

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

Thursday, 5 November 2026, 9:05
Next Post

पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे ग्राम विकास केंद्रांचा व्हीसीडीसी चा शुभारंभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp