बीड : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया आणि इतर ठिकाणी व्हायरल होत होती. आता या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात त्यांच्यावर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या कथेत ऑडिओ प्रकरणामुळे चर्चेत आलेले बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.