परळी : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे स्थान आहे. संपुर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या व्यक्तीने, मी सही केली नाहीयेय असे निवडणूक निर्णय अधिका-यांसमोर स्पष्ट केले आहे, त्यामुळे करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांचे 15 अर्ज बाद ठरले. करुणा मुंडे यांनी आपल्या स्वराज्य सक्ती सेना पक्षाकडून परळीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पती धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी अर्ज दाखल केल्याने राज्यभरात चर्चा सुरु होत्या, परंतु आज उमेदवार अर्ज छाननीत करुणा मुंडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांनी बाद ठरवला आहे. त्यामुळे परळीत आता धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे म्हणजेच पती विरुद्ध पत्नी असा सामना आता होणार नाहीयेय.
दरम्यान, करुणा मुंडे यांनी (दि. 02 ऑक्टोबर) रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. याबरोबरच स्वत: करुणा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघातून पती धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याबाबत घोषणा केली होती. पती धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी अर्ज दाखल केल्याने राज्यभरात चर्चा सुरु होत्या, परंतु आज उमेदवार अर्ज छाननीत करुणा मुंडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांनी बाद ठरवला आहे.