हिंगोली : हिंगोलीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. हिंगोलीतील प्रचार सभेला जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून अमित शाह यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका केली होती. अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅगेची तपासणी करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
अखेर निवडणूक आयोगाकडून केंद्रीय गृहमंत्री अमितच शाह यांच्या बॅगेची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. हिंगोलीतील प्रचार सभेला जात असताना निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून अमित शाह यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. हिंगोलीच्या प्रचार सभेत अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी..
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे प्रचार सभेला जात असताना हेलीपॅडवरच त्यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.
निवडणूक आयोगाचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगेची तपासणी करणार का? असा सवाल त्यांनी तेवहा उपस्थित केला होता. सोबतच एका अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॅग चेक केली त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. तर दुसरीकडे सोलापुरात पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांची प्रचार सभा असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली होती. यावरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.