Income Tax raid : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आयकर विभागाकडून मोठ्या प्रमामात धाडी टाकण्यात आल्या आहे. संभाजीनगर शहरात 11 ठिकाणी एकाचवेळी आयकर विभागाने या धाडी टाकल्या आहेत. ही कारवाई मोठ्या अधिकारी वर्गाच्या घरी आणि व्यावसायिकांच्या घरी टाकल्याच कळतयं.
कर चुकवल्याप्रकरणी व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. छाड पडलेले लोक बांधकाम व्यावसायिक असून अद्याप त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. या कारवाईत 200 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. त्याशिवाय, शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आयकर विभागाने छत्रपती संभाजीनगर शहरात अचानक अकरा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या आहेत. शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे. या बांधकाम व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू असणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.