बीड : जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काळात गंभीर पाणीटंचाईला समोर जावे लागेल अशी परिस्थिती असल्याची जाण असताना ही जिल्हा प्रशासनाकडून अवैध पाणी उपशाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा प्रशासन झोपेत असून, सर्रासपणे पाण्याचा अनधिकृतरीत्या उपसा केला जात आहे
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी पाणीटंचाई आराखड्यात पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवत अवैध पाणी उपशावर प्रतिबंध करण्यासाठी पाटबंधारे विभाग, महसूल, पंचायत समिती, महावितरण, पोलिस प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे संयुक्त पथक नेमून कारवाईचे आदेश दिलेले आहेत. असे असतानाही पाटोदा तालुक्यातील भावाळा साठवण तलावातून पाणी उपसा सुरू असून, अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाच्या अवमानप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.