परभणी: परभणीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतावर घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतुन तरुण शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना माळसोन्ना येथे घडली आहे. सचिन जाधव (वय- 35) यांनी (ता.13 एप्रिल) असं विष प्राशन केलेल्या शेतकाऱ्याचं नाव आहे. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 14 एप्रिल) रात्री त्याच्या पत्नीनेही विष प्राशन केले. उपचारादरम्यान महिलेचा नांदेड येथे मंगळवारी (ता.15) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
ज्योती सचिन जाधव (वय- 30 वर्ष) विष प्राशन करून जीवनयात्रा संपविलेल्या महिलेचे नाव आहे. मृत्यू झालेली महिला 7 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. पती पाठोपाठ पत्नीनेही जीवनयात्रा संपवल्याने दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत. या घटनेने माळसोन्ना गावावर शोककळा पसरली आहे.