Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“अगं आता आपण लग्न करणार आहे” लग्न ठरल्यावर तरुणीला लॉजवर नेलं, जबरदस्ती संबंध ठेवले अन् लग्नाची तारीख जवळ आल्यावर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 June 2026, 20:32

बीड: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील भरत चंद्रकांत तोंडे या अग्नीवीर जवानाविरोधात एका 24 वर्षीय तरुणीने लैंगिक शोषण, फसवणूक आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भरत तोंडे याच्यासह त्याच्या कुटुंबातील 7 सदस्यांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. दोन्ही कुटुंबांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली होती आणि संबंधही निश्चित झाले होते. तक्रारीत म्हटले आहे की, 20 डिसेंबर 2025 रोजी आरोपीने आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी बोलावले असल्याचे सांगून तिला दुचाकीवरून एका लॉजवर नेले. तेथे भविष्यात लग्न होणार असल्याचे सांगत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 6 मे 2026 रोजी विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले. लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली होती. विवाहासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आणि निमंत्रणपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र, लग्नाची तारीख जवळ येत असताना 21 एप्रिल 2026 रोजी आरोपीने फोन करून लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.

तसेच, यापुढे संपर्क साधल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि जीव घेण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या आधारावर पोलिसांनी लैंगिक शोषण, फसवणूक, धमकी आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान, गुन्हा दाखल होऊन सुमारे महिनाभराचा कालावधी उलटूनही आरोपींना अटक झालेली नसल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात येत आहे. तसेच काही प्रभावशाली व्यक्तींच्या दबावामुळे तपासाची गती मंदावल्याचा दावाही करण्यात आला आहे.

न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत पीडित तरुणीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे आणि पुढील पोलिस कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी दत्तात्रय कदम! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र; पक्षासाठीचे योगदान व निष्ठा पाहून निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp