आदित्य बोराटे

इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी इंदापूर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते दत्तात्रय दशरथ कदम यांची निवड करण्यात आली आहे.मंगळवार दि. 16 जून रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दत्तात्रय कदम यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

दत्तात्रय दशरथ कदम हे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व मधुकर भरणे तसेच भरणे कुटुंबातील यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व पक्षवाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, नियोजन समितीचे माजी पुणे जिल्हा सदस्य सचिन सपकळ, पक्षाचे प्रवक्ते संदेश देवकर, युवा नेते मनोज जगदाळे, रमेश म्हेत्रे, आण्णासाहेब कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर दत्तात्रय कदम यांनी वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, पक्ष संघटन जिल्ह्यात अधिक मजबूत करू, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या निवडीबद्दल इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
तसेच सामाजिक आणि निस्वार्थ काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते दत्तात्रय कदम यांना राष्ट्रवादी पक्षाने पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्ष संघटना अधिक बळकट होईल असे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव गुरगुडे यांनी सांगितले.






