हिंगोली : अनैतिक संबंधातील वादातून एका दिव्यांगाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील केळी या गावात ही घटना घडली आहे. या घटनेत व्यंकटी सांगळे या 35 वर्षीय दिव्यांग इसमाचा खून करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमान सांगळे याची मृत व्यंकटी सांगळे यांच्या पत्नीसोबत ओळख होती. दरम्यान ओळखीतून त्यांच्यात आधिक जवळीक होत असल्याचा संशय मृत व्यंकटी सांगळे याला होता. या संशयावरून पती पत्नीत कायम वाद होत होते. असाच वाद व्यंकटी सांगळे आणि त्याच्या पत्नीमध्ये एकदीवस झाला. परिणामी या वादाच्या रागाातून संतापलेल्या व्यंकटी सांगळे यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेत आत्महत्या केली.
पत्नीच्या मृत्यूनंतरही या कारणावरून नेहमीच हनुमान सांगळे आणि मृत व्यंकटी सांगळे यांच्यामध्ये वाद होत होते. हाच राग मनात धरून त्याचा बदला घ्यावा असा विचार करत हनुमान सांगळे याने केला. पुन्हा या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादातून राग विकोपाला गेला आणि हनुमान सांगळे याने व्यंकटी सांगळेला जोरदार मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यावर मोठा दगड मारला.
त्यानंतर व्यंकटी रक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हनुमान सांगळे यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या थरारक घटनेची चौकशी सुरू केली आसता त्यातून हनुमान सांगळे याने ही हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.