बीड : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगताना दिसत आहे. राज्यात आता पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीची चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा भावी उपमुख्यमंत्री मा. पकंजाताई मुंडे यांचे हार्दिक अभिनंदन. माजलगावच्या पंकजा मुंडे समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरजी राजकीय वर्तळात चर्चा सुरु झाली आहे. पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री असणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सध्या आनंदाचं वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पंकजा मुंडेंचे ‘भावी उपमुख्यमंत्री’ असे म्हणत अभिनंदन केल्याचे पोस्टर माजलगावमध्ये झळकले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.