अंबाजोगाई: मित्राची पोलीसमध्ये निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेली पार्टी करून स्विफ्ट डिझायर कारमध्ये गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात कारचा चुराडा झाल्याने तिघे जागीच ठार, तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आंबासाखर कारखाना ते लातूर रस्त्यावर असलेल्या वाघाळवाडीजवळ मंगळवारी घडली.
अपघातात बालाजी शंकर माने (३०), फारुख बाबुमियाँ शेख (३०), दीपक दिलीप सावरे (३२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी ऋत्विक हनुमंत गायकवाड (३०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुबारक सत्तार शेख (३४), अजित पाशुमिया शेख (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.