केज : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका ४४ वर्षीय महिलेकडे बघून वडिलाने लघुशंका केली. तर मुलाने हाताने अश्लिल चाळे करून लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. तसेच गावात राहू नको म्हणत धमकविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघा बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील ४४ वर्षीय विवाहित महिला ही २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता गावातील एकाच्या शेताजवळ असताना सहदेव सिताराम घोळवे व त्यांचा मुलगा माधव सहदेव घोळवे (दोघे रा. पिंपळगाव) या दोघां बाप-लेकांनी संगनमत करीत सहदेव घोळवे याने महिलेकडे तोंड करीत लघुशंका केली. तर त्याचा मुलगा माधव घोळवे याने हाताने अश्लिल आणि लज्जास्पद चाळे करुन त्या महिलेचा विनयभंग केला. तसेच बाप-लेकांनी त्या महिलेला शिवीगाळ करीत ‘तू या गावात का राहतेस ?, तू हे गाव सोडून निघून जा’, असे म्हणूनही धमकावले अशी तक्रार सदर महिलेने दिली. या तक्रारीवरून सहदेव घोळवे, माधव घोळवे या दोघा बाप-लेकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरक्षक राजू वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.