वाळूज महानगर : रांजणगाव शे.पु येथे गल्लीत सायकल खेळणाऱ्या ८ वर्षीय मुलीवर पडक्या बाथरूममध्ये नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५२ वर्षीय नराधमाविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत गायके (रा. त्रिमुर्ती नगर, रांजणगाव शेणपुंजी ता. गंगापुर) असे आरोपीचे नाव आहे. सिमा (वय ८ वर्ष. नाव बदलेले आहे) ही रांजणगाव (शे.पु) येथे आई वडील व एक बहिणी सोबत वास्तव्यास असून तीचे वडील कंपनीत काम करतात, तर आई ही घरगुती किराणा दुकान व पिठाची गिरणी चालवते.
दरम्यान मंगळवारी (दि.९) सायकांळी ६ वाजेच्या सुमारास सिमा ही गल्लीत सायकल खेळत होती. थोड्या वेळेनंतर शेजारी राहणारी एक महिला सिमाच्या आईकडे येत सिमाला कोणीतरी ओढत पडक्या घर नेल्याचे सांगितले. तेव्हा आईला धक्काच बसला. त्यातून त्यांनी स्वतःला सावरत पडक्या घराकडे धाव घेतली. मुलीचे नाव घेत आईने तिला मोठ्याने आवाज दिला. परंतु, आतून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा सिमाच्या आई पडक्या घरात आणखी आत शिरली. त्यावेळी तिला नराधम श्रीमंत गायके याने सिमाचे तोंड दाबून तिला जवळ घेऊन ओढून धरल्याचे दिसले.
तेव्हा पीडीतेच्या आईने त्याच्या हातातून मुलीला ओढून घेत तिची सुटका केली. यावेळी झालेल्या झटापटीत पीडीतेच्या आईच्या दोन्ही हातांना आरोपी गायकेनी नखे ओरबाडली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पीडीतेची आईने व लगतच्या महिलेने तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळण्यास मदत झाली. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. या प्रकरणी श्रीमंत गायके (रा. त्रिमुर्तीनगर रांजणगाव शे.पु) यांच्या विरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.