गंगापूर: कांदा निर्यात बंदीचा फटका, अपेक्षित खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इतर पिकापेक्षा अधिक आर्थिक लाभ होईल, या आशेवर यंदा गंगापूर तालुक्यातील गोदावरी पट्धात बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा पिकाला पसंती देवून त्यावर जास्त खर्चही केला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व धुक्यामुळे कांदा पिकांवर थ्रीप्स, बुरशी अशा बऱ्याच रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते.
सध्या अनेक कांदा उत्पादकांनी पिकाची काढणी केली तर काहींची सुरू आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळालेला नाही. त्याच प्रमाणे कांदा निर्वात बंद असल्याने योग्य भाव मिळत नसल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यातून बोलले जात आहे. १४० कोटीच्या देशात सर्व महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर मूठभर लोकांचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे.
विरोधी पक्षातील नेते प्रत्येक भाषणात हेच सांगत आहेत. मात्र काही सरकार धार्जिनी बुद्धीजीवी म्हणतात विरोधी पक्षच नाही. त्यांच्याकडे मुद्दे नाही, त्यांच्याकडे भरपूर मुद्दे आहेत. परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत नीट पोहचवले जात नाहीत. मुळ प्रश्नापासून शेतकरी आणि सामान्य माणूस दूर राहतो अशी खंत प्रा. दिलीप बिरुटे यांनी व्यक्त केली. तर गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५२५ तर जास्तीत जास्त १हजार ४०० रुपयांचा दर मिळाला असून सरासरी १ हजार १७० रुपयांचा दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केल्यानंतर पेमेंट तत्काळ रोख स्वरूपात घ्यावे. पुढील तारखेच्या अमापावत्या घेऊ नयेत. पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास २४ तासाच्या आत कार्यालयामध्ये लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन सभापती भाऊसाहेब पदार यांनी केले आहे.